Sunday, October 24, 2021

नगर जिल्ह्यात कांद्याला मिळतो 3000 हजारांच्या पुढे भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातीलअकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या 1830 गोण्यांची आवक झाली. कांद्याला आज तीन हजाराच्या पुढे भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी खूश झालेले आहेत.

एक नंबर कांद्याला 3111 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला. कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांदा : 2751 ते 3111, दोन नंबर कांदा :2051 ते 2751, तीन नंबर कांदा : 1451 ते 2051, गोल्टी कांदा 1551 ते 2100, खाद 450 ते 950 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला.

अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात आणावा.

जार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे, नाकाला व तोंडाला मास्क लावणे, बाजार आवारात कुणीही थुंकू नये, सामायिक अंतर राखणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!