Monday, October 18, 2021

 महाराष्ट्रात आजपासून शाळा सुरू, सरकारची नवी नियमावली जाहीर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरू होत असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. आजपासून ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता 12 वीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरू होत आहेत.

 राज्य सरकारने शाळांसाठी नवी नियमावली तयार केलीय. राज्य सरकारने शाळांना पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा कऱण्यास सांगितलं आहे.4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.राज्यातील कोविड संक्रमण स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला.

कोरोना नियमावलीनुसार शाळा सुरु झाल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांचं शाळेत आगमन होताच त्यांचं तापमान मोजलं जात आहे.पुढे वर्ग खोल्यामध्ये प्रवेश करण्याअगोदर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वेलकम लिहित तुम्हाला पाहून आनंद झाला, असा आशय असलेले बोर्ड दादरच्या शाळेत लावण्यात आले आहेत.

यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं खास पद्धतीने स्वागत केलं. दीड वर्षानंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची आरती ओवाळण्यात आली.तब्बल दीड वर्षानंतर प्रत्यक्षात शाळेत जाऊन मित्र-मैत्रिणींना भेटल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.शिक्षकांनी लगोलग अभ्यासक्रमाला सुरुवात न करता

विद्यार्थ्यांशी गप्पा माराव्यात, त्यांच्या मनावरील ताण हलका करावा, परिस्थितीशी एकरुप व्हायला त्यांना काही दिवस द्यावेत, अशा सूचना शिक्षण विभागाने शिक्षकांना दिल्या आहेत.राज्यभरातील शाळांत शारीरिक अंतर राखून वर्ग भरवले जात आहेत.

आज शाळा सुरू झाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांची संवाद साधणार आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!