Sunday, October 24, 2021

राज्यभर गाजलेल्या नगर जिल्ह्यातील कोपर्डी अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची प्रकरणाची सुनावणी तहकूब

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यभर गाजलेल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची सुनावणी आज (ता.४) सोमवार मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज

चव्हाण यांच्यासमोर होणार होती. मात्र या प्रकरणाच्या सुनावणीबाबत विशेष सरकारी वकीलांनी नुकतीच माहिती दिली आहे.विशेष सरकारी वकीलांची माहितीयाप्रकरणी सरकार पक्षातर्फे आपण बाजू मांडणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी दिली होती. मात्र प्रकरण तांत्रिक

कारणामुळे खटला चालविण्यास न्यायमूर्तींनी नकार दिला. त्यामुळे ही सुनावणी तहकुब करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता दुसऱ्या न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग होणार आहे. त्यानंतर या प्रकरणाची नियमित सुनावणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती यादव-पाटील यांनी दिली.

औरंगाबाद खंडपीठात आरोपींच्या फाशी निश्चितीकरणाचा अर्ज कोपर्डी येथील अत्याचार आणि खून प्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने तीनही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. सदर फाशीच्या शिक्षेच्या निश्‍चितीकरण्यासाठी राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठ येथे फाशी निश्चितीकरणाचा अर्ज दाखल केला होता. त्याचप्रमाणे, यातील आरोपी

क्रमांक दोन संतोष भवाळ याने फाशीच्या शिक्षेच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते. त्यानंतर सदर प्रकरणाची औपचारिक सुनावणी औरंगाबाद खंडपीठ येथे होऊन यातील आरोपी भवाळ याच्या अपिलाच्या सुनावणीच्या दरम्यान त्याच्या अपिलाला झालेला विलंब माफ करून अपील दाखल करून घेण्यात आले होते.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...

नगर जिल्ह्यात उद्यापासून खडी क्रशर, खाणपट्टा सोमवारपासून बंद ?

माय महाराष्ट्र न्यूज: खडी क्रशर, खाणपट्टा धारकांवर जाचक अटी राज्य सरकारकडून घातल्या आहेत. त्या मागे घ्याव्यात. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात रॉयल्टी दर कमी करण्याची मागणी...
error: Content is protected !!