Friday, October 22, 2021

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी कोर्टाची मंजूरी,अर्जाच्या 30 दिवसाच्या आतमध्ये पेमेंट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशनाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. कोर्टाने असे म्हटले की, मृत व्यक्तीच्या परिवाराला मिळाणारी नुकसान भरपाई ही

दुसऱ्या कल्याण योजनेपेक्षा वेगळी असणार आहे. अर्जाच्या 30 दिवसांच्या आतमध्ये हे पेमेंट केले जाणार आहे. रक्कमेचे पेमेंट हे आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून दिले जाणार आहेत.तर 23 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश एम आर शाह आणि ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणीचा आदेश सुरक्षित ठेवला आहे.

त्या वेळी केंद्राने प्रत्येक मृतांसाठी 50 हजार रुपये नुकसान भरपाई ठरवण्याची माहिती कोर्टाला दिली होती. तेव्हा कोर्टाने यावर नाराजी व्यक्त करत असे म्हटले की, प्रतिकूल परिस्थिती मध्ये भारताने जे केले तसे कोणीही करु शकले नाही.30 जून रोजी दिलेल्या आदेशात सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना

नुकसान भरपाई दिली पाहिजे. कोर्टाने असे मानले की, या प्रकारच्या आपत्कालीन काळात लोकांना नुकसान भरपाई देणे सरकारचे वैधानिक कर्तव्य आहे. मात्र नुकसान भरपाईची रक्कम किती असेल हा निर्णय कोर्टाने सरकारवर सोडला होता. तेव्हा सुप्रीम कोर्टाने नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी

यांनी म्हटले की, 6 आठवड्यात नुकसान भरपाईची रक्कम ठरवून राज्यांना सांगावी. NDMA ने नंतर कोर्टाकडून अतिरिक्त वेळ मागून घेतला होता. कोर्टाच्या निर्णयानंतर 12 आठवड्यांनी त्यांनी नुकसान भरपाईचा निर्णय घेतला. त्यानंतर कोर्टाने औपचारिक मंजूरी दिली आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!