Monday, October 25, 2021

अखेर तब्बल सहा तासानंतर सुरु झाले अखेर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज काही वेळापूर्वी मोबाईलचं इंटरनेट बंद पडलंय की काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण काही वेळापुर्वी तुम्हाला फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅपचे अपडेट्स येणं बंद झालं असेल. तुम्ही अनेक प्रयत्न केले असतील मात्र, ते करुनही तुम्ही

अयशस्वी ठरला असाल. याचं कारण ही अडचण काही तुमच्या एकट्याला येत नसून संपूर्ण जगातील फेसबुकसंबधित अ‍ॅप्स बंद पडले होते. यामध्ये प्रामुख्याने फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम या अ‍ॅप्सचा समावेश होता. काल सायंकाळी 9:15 वाजेच्या

सुमारास फेसबूक आणि व्हाट्सअप अ‍ॅपप्लिकेशन बंद पडले होते. मात्र आता तब्बल सहा तासानंतर हे अ‍ॅप्स पुन्हा एकदा सुरु झाले आहेत.सुरूवातीला काही काळ पावसामुळे इंटरनेट गेल्याची शंका निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप वगळता सर्व वेबासाईट्स सुरू असल्याचं दिसून आलं.

यानंतर ट्विटर फेसबुक डाऊन, व्हाट्सअ‍ॅप डाऊन असे ट्रेंड देखील सुरु झाले. यापुर्वी देखील अनेक वेळा काही तांत्रिक अडचणींमुळे फेसबूक आणि व्हाट्सअप बंद झाल्याचे आढळले होते.याबाबत आता फेसबुकने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्हाला माहिती आहे की काही लोकांना

आमच्या अ‍ॅप्स आणि उत्पादने वापरण्यामध्ये अडचणी येत आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी पूर्ववत करण्यासाठी काम करत आहोत आणि होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.व्हाट्सऍपने म्हटलंय की, काहींना सध्या व्हाट्सअ‍ॅप वापरण्यामध्ये अडचण येत असल्याचं आम्ही जाणून आहोत.

परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याबाबत आम्ही लवकरच माहिती देऊ.सोशल मीडिया ही गोष्ट आता प्रत्येकासाठीच अत्यावश्यक झाली असून, हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद असल्याने अनेकजण हैराण झाले होते. त्यानंतर आता ट्विटर व्हाट्सअप आणि फेसबूक

डाऊनचा हॅशटॅग ट्रेंड झाले होते. त्यानंतर अनेकांनी आपलं फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप बंद झाल्याने वेगवेळे प्रयोग करून सुरू करण्याचा प्रयत्न केले. मात्र नंतर कंपनीकडूनच अडचण असल्याचे समोर आलं आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!