Monday, October 25, 2021

नगरच्या माजी पालकमंत्र्यांचा आरोप:ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दोन वर्षांपासून केवळ खोटी आश्वासने देत जनतेस झुलवत ठेवणार्‍या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना प्रत्येक संकटात वार्‍यावर सोडले आहे. अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकर्‍यास कवडीचीही मदत

न देता पाठ फिरविणारे ठाकरे सरकार शेतकरी विरोधी नव्हे, तर शेतकरीद्रोही आहे, असा घणाघाती आरोप करीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी सोमवारी ठाकरे सरकारच्या शेतकरीद्रोही कारवायांचा पाढाच माध्यमांसमोर उघड केला.

दुसर्‍या टाळेबंदीत रोजगार बुडालेल्या हजारो कुटुंबांच्या मदतीसाठी केंद्राकडे बोटे दाखवत ठाकरे सरकारने ती जबाबदारीदेखी टाळली. नंतरच्या तौक्ते चक्रीवादळात केवळ धावता दौरा करून मदतीचे गाजर दाखवत परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी या वादळग्रस्तांनाही वार्‍यावर सोडले आणि आता

अतिवृष्टीच्या भीषण संकटात सापडून, उस , सोयाबीन , कापूस आदी पिकांच्या हानीमुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकर्‍याविषयी साधी सहानुभूतीदेखील न दाखविता नियमांच्या कागदावर बोटे नाचवत दाखवत शेतकर्‍यांची क्रूर थट्टा सुरू आहे, असा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष शिंदे यांनी केला.

शाब्दिक फुंकर मारून संकटग्रस्तांचे आश्रू पुसण्याचा कांगावा करताना आपली कातडी बचावण्यासाठी केंद्र सरकारकडे बोटे दाखविणार्‍या ठाकरे सरकारचा मुखवटा उघडा पडला असून सरकारचा खरा चेहरा शेतकरीद्रोहीच आहे, असे ते म्हणाले.

कोणालाही वार्‍यावर सोडणार नाही अशी खोटी आश्वासने देऊनही आता पाच महिने उलटून गेले. वादळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी अजूनही वार्‍यावरच आहेत आणि आता अतिवृष्टीग्रस्तांची भर पडली असल्याचे शिंदे म्हणाले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!