Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यात त्याने वीस ते पंचवीस मित्रांना एकत्र जमवून तलवारीने केक कापला मग पुढे…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वीस ते पंचवीस मित्रांना एकत्र जमवून तलवारीच्या साह्याने वाढदिवसाचा केक कापणे एका जणाला चांगलेच महागात पडले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पोलीस ठाण्याच्या कोर्हाळे बीट हद्दीत २८ सप्टेंबर रोजी

रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राहाता तालुक्यातील केलवड गावात वसीम युनुस खाटीक मूळ राहाणार केलवड आणि सध्या राहणार राहाता शहरातील नवनाथनगर याने केलवड येथे वाढदिवसानिमित्त वीस ते पंचवीस मित्रांना एकत्र जमवून तलवारीच्या

साह्याने केक कापल्याची माहिती राहता पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे.खाटीक हा कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेला होता, चार दिवसांनी तो राहात्यात आल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही तलवार प्लास्टिकची असल्याचे पोलीस

तपासात निष्पन्न झाले असले तरी कोविडची परिस्थिती बघता जिल्हा प्रशासनाने निर्बंध कडक केलेले असल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि २० ते २५ जणांचा समूह एकत्र जमून कोविड रोगाचा प्रादुर्भाव होईल असे वर्तन केल्याप्रकरणी वसीम युनुस खाटीक याच्या विरोधात पोलीस नाईक

कल्याण काळे यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 188, 269, 271 यासह साथरोग अधिनियम 1897 चे कलम 2 ( ब ) आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!