Monday, October 25, 2021

शिर्डीतील साई संस्थानच्या विश्वस्त मंडळ नियुक्तीचा पेच कायम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिर्डी संस्थासाठी नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी सुरू असताना १६ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली. मात्र, याची माहिती उच्च न्यायालयाला कळविली नसल्याने न्यायालयाने

या मंडाळा धोरणात्मक निर्णय घेण्यास चार ऑक्टोबरपर्यंत मनाई केली होती. चार ऑक्टोबरला याचिकेवर सुनावणी झाली, तेव्हा याचिकेचा हेतू सफल झाल्याचे सांगून ती निकाली काढण्यात आली. मात्र, नव्या विश्वस्तांना करण्यात आलेली मनाई १९ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.

दरम्यान सात ऑक्टोबरला तदर्थ समितीची बैठक घेण्यात येणार आहे. पुढील आदेश येऊपर्यंत ही समिती काम पाहणार आहे, अशा आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी दिली. न्यायालयाने हा आदेश १९ ऑक्टोंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत कायम राहील.

मात्र या दरम्यान कोणी याचिका दाखल केली नसल्यास तदर्थ समिती नवीन विश्वस्तांना अधिकार सुपूर्द करेल. तोपर्यंत देवस्थानचे अधिकार व कामकाज तदर्थ समितीकडे राहणार आहेत, असेही आदेशात म्हटले आहे.नवीन विश्वस्त मंडळासंबंधीही अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्त संजय काळे

यांनी यापूर्वीच हे आक्षेप घेत न्यायालयात जाण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे मधल्या काळात नव्या विश्वस्त मंडळाविरोधातही याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे. याचिका दाखल झाली तरी १९ ऑक्टोबरपर्यंत त्यावर न्यायालयाने

कोणताही आदेश दिला नाही, तर नवे विश्वस्त मंडळावर कारभार पाहण्यासाठी घालण्यात आलेली मनाई उठणार आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!