Monday, October 18, 2021

नगर ब्रेकींग:धक्कादायक: पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू तर तीन जणांना..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :नगर जिल्ह्यातील मुळा धरणक्षेत्रात सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने धरणातून मुळानदीत सोडणार येणारा विसर्ग आज सकाळी वाढवून ६ हजार १५० क्‍युसेकने होता, तो विसर्ग सकाळी ८ वाजता ८ हजार ६८० क्युसेक करण्यात आला आहे.

नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभाग व प्रशासनाने केला आहे. राहुरी शहरासह परिसरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मल्हारवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला. राहुरी शहरात ४० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील मुळा नदीवरील पुलाजवळील गणपती घाटानजिक नदीत पोहायला गेलेल्या पाचपैकी दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघेही सख्खे भाऊ होते.स्थानिक तरूणांनी तीन जणांना वाचविले.

मात्र दोघेजण पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती समजताच राहुरी नगरपालिकेचे पथक तातडीने अग्नी शामकसह दाखल झाले. बुडालेल्या दोन मुलांचा शोध सुरू आहे. अमर पगारे ( वय १४ ) व सुमित पगारे (वय १२ ) असे या दोघांची नावे आहेत.

नदीपात्रात सध्या मुळा धरणातून ८ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याने नदीला पूर आला आहे. त्यातच वाळू उपशामुळे नदीपात्रात सुमारे दहा फुटाहून अधिक खोलीचे डोह तयार झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!