Saturday, October 23, 2021

म्हणून मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले मी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: उर्जा विभागाने नुकताच विद्युत सहायक भरतीचा निकाल जाहीर केला असून 4 हजार 534 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. मात्र, यावरुन काही विद्यार्थी नाराज झाले असून, ज्यांना चांगले टक्के आहेत त्यांचे नुकसान झाल्याचा आरोप विद्यार्थी आता करू लागले आहेत.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे

आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. महावितरण कंपनीची विद्युत सहाय्यक पद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून, कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे करण्यात येणार येणार आहे. ज्या उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला असेल त्यांना

नियमानुसार अपात्र घोषित करण्यात येईल, कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन प्राजक्त तनपुरे यांनी दिले. एचएसबीसी, फोर्ट येथील महावितरण सूत्रधार कंपनीच्या इमारतीमध्ये राज्यातील निवडक विद्युत सहायक उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्त्तरे देऊन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारांचे समाधान केले.दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल पारदर्शकपणे जाहीर करण्यात आला आहे. या निकालाबाबत माध्यमांतून आणि समाजमाध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होते.

याकरिता राज्यातील विविध भागातून विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज केलेले आणि या निकालावर शंका असलेल्या उमेदवारांना बोलावून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे. निकालात कसल्याही प्रकारची चुक झाली नसल्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले. सर्व निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची

यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये कट ऑफ, राखीव जागा, आरक्षण, गुणांकन आदी बाबी स्पष्ट होतील. त्यानंतर कोणाचीही शंका राहणार नाही. भरती प्रक्रिया लवकर पुर्ण करण्यासाठी कागदपत्रे तपासणी करून नियुक्ती पत्रेही देण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होत आहे.

सर्व उमेदवारांना न्याय मिळणार आहे. कोणीही कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी केले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!