Monday, October 25, 2021

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीचे लग्न; इच्छा नसतानाही पतीने  ठेवले तिच्यासोबत वेळोवेळी ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे लग्नाच्या घटना समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात मुलीची आई, पती व सासर्‍या विरोधात

अत्याचार, पोक्सो, बालविवाह प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.नगर शहरात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीचे लग्न तीन वर्षापूर्वी तिच्या आईने नात्यातीलच एका मुलासोबत लावून दिले. त्यावेळी त्या मुलीचे वय 14 वर्षे होते.

तिचा या लग्नाला विरोध होता. मुलीची इच्छा नसतानाही पतीने तिच्यासोबत वेळोवेळी शरिरसंबंध ठेवले. पतीला जुगाराचा नाद असल्याने तो जुगारात पैसे हरल्यानंतर मला घरी येऊन त्रास देत, माझ्या आईला मारून टाकायची धमकी देत असल्याचे, पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

पिडीत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने तिला महापालिकेच्या रूग्णालयात दाखल केले. तिने एका मुलीला जन्म दिला. यानंतर पीडित मुलगी आईच्या घरी वास्तव्यास गेली असता तिचा पती तिला तेथे येऊन त्रास देत होता. यानंतर

त्यांनी चाईल्ड लाईनची मदत घेत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!