माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर सुद्धा दिसून येत आहे. गेल्या
अनेक दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचे सत्र सुरू होते. मात्र आज म्हणजेच बुधवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
ऐन लग्नसराईत सोने-चांदी दरात मोठी वाढ झाल्याने खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अशातच तुम्ही सुद्धा लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल,
तर तर आधी त्याचे सुधारित दर जाणून घ्या कारण आज तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे.इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कालच्या तुलनेत चांगलीच
वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रतितोळा ७३० रुपयांनी महागले आहेत. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा ५ हजार ६७८ रुपयांवर पोहचला आहे.
सोन्याबरोबर चांदीच्या दरातही आज मोठी वाढ झाली. मंगळवारी चांदीचे भाव काही प्रमाणात घसरले होते. मात्र, बुधवारी सराफा बाजार खुलताच चांदीच्या दरात प्रतिकिलो ३ हजार ३०० रुपयांची ऐतिहासिक
वाढ झाली आहे. अचानक झालेल्या वाढीमुळे आज सराफा बाजारात १ किलो चांदीचा दर ७२ हजार रुपयांवर पोहचला आहे.भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील
दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, ही मध्यवर्ती संरचना आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतात