Saturday, October 23, 2021

फेसबुक, व्हाट्सऍपनंतर आता जियोचे नेटवर्क देखील डाऊन ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील सर्वांत मोटी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी रिलायन्स जियोच्या ग्राहकांना आज मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर सध्या #jiodown हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होतोय.

काही मिनिटांपासून हा ट्रेंड क्रमांक एकवर आहे. अनेक ग्राहकांनी जियोचे नेटवर्क डाऊन असल्याची तक्रार केली आहे. काही ग्राहकांनी म्हटलंय की, गेल्या काही तासांपासून जियोचे नेटवर्क काहीच काम करत नाहीये. तर काही ग्राहकांनी म्हटलंय की, फेसबुक, व्हाट्सऍपनंतर आता जियोचे नेटवर्क देखील डाऊन झालं आहे.

इंटरनेट आउटेज ट्रॅकर डाउनडिटेक्टरवर जिओ कनेक्शनमधील तक्रारींचे 4,000 रिपोर्ट आहेत आणि ते सातत्याने वाढताना दिसत आहेत. डाऊनडेक्टरवरील डेटा पाहता, बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास या तक्रारींची माहिती मिळू लागली आणि सुमारे एका तासात या तक्रारी वाढतच गेल्या असून सध्या शिगेला पोहोचू लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जियोची सर्व्हीस संपूर्ण देशात बाधित झालेली नाहीये. मात्र काही भागात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. गेल्या एक-दिड तासापासून ही अडचण येत आहे. कंपनीची टेक्निकल टीम याबाबत सध्या काम करत आहे. लवकरच ही समस्या दूर होईल, अशी अपेक्षा आहे.

रिलायन्स जियोच्या ऍक्टीव्ह मोबाईल ग्राहकांची संख्या जुलैमध्ये 61 लाखांनी वाढली होती. जुलै अखेरपर्यंत जियोच्या मोबाईल कनेक्शनची संख्या 34.64 कोटी होती.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता...
error: Content is protected !!