Sunday, October 24, 2021

…तर निधी देण्याची जबाबदारी माझी-युवानेते उदयन गडाख

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, तुमच्या गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी अशी ग्वाही  युवा नेते उदयन गडाख यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे नव्या ग्रामपंचायत कार्यालय, खुली व्यायाम शाळा व पाणी शुद्धीकरण प्लॅन्टचे उदघाटन तर भानसहिवरे येथे खुल्या व्यायामशाळेचे लोकार्पण युवा नेते गडाख यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, बाजार समितीचे सभापती शिवाजी शिंदे, सरपंच प्रियांका व शरद आरगडे, उपसरपंच मारुती आरगडे, भानसहिवरेच्या सरपंच मीना जोजार, उपसरपंच अय्याज देशमुख, बाबासाहेब ढवाण, प्रवीण वंजारे, बाळासाहेब भणगे, सुभाष भणगे, तुकाराम भणगे, नानासाहेब टाके, ज्ञानदेव आरगडे, बाळासाहेब आरगडे, रामकृष्ण आठरे आदी उपस्थित होते.
उदयन गडाख पुढे म्हणाले, “आपल्या गावासाठी कोण निधी देऊ शकतो याचा विचार करून गावाने त्या नेत्याच्या पाठीशी राहिले पाहिजे. सौंदाळे ग्रामस्थांची एकी व गावातील विकासकामे हे दिशादर्शक आहे.
प्रास्ताविक शरद आरगडे व किशोर जोजार यांनी केले. यावेळी धनेश मुनोत, सुभाष भणगे, दनियल मकासरे, बाळासाहेब उगले, बाळासाहेब बोधक, सचिन आरगडे, कनिफ आरगडे, बबन आरगडे, अण्णासाहेब आरगडे, मधुकर आरगडे, मिननाथ आरगडे, बाबासाहेब बोधक, ज्ञानदेव चामुटे, विजय चामुटे उपस्थित होते. बाळासाहेब झावरे यांनी सूत्रसंचालन केले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!