Tuesday, October 26, 2021

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:कांदा ६० ते ७० रुपये प्रति किलो होणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील सततच्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात सध्या सुमार दर्जाचा कांदा येत आहे. कांद्याची आवक कमी झालेली असतान मागणी वाढल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. गेल्या आठवड्यात तीस रुपये प्रति किलो

असलेला कांदा ५० रुपये किलोवर गेला आहे. सुमार दर्जाचा कांदाही ४० रुपये प्रति किलो झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर कांदा ६० ते ७० रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे. मागणीच्या तुलनेत कांदा कमी येत असल्याने इतर राज्यातून कांद्याची आवक सुरू झालेली आहे. सध्या ठोक बाजारात

पांढऱ्या कांद्याची ४० किलोचे पोते ४५० ते ८५० रुपये तर लाल कांदा ४०० ते ९०० रुपयांत खरेदी केला जात आहे. नव्याने येत असलेला कांदा पावसामुळे ओला झालेला आहे. त्याचा दर्जा घसरला आहे. यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. दर्जेदार कांद्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहे.

ठोक बाजारात कांदा महागल्याने किरकोळ बाजारातही भाव वाढलेले आहे. सध्या किरकोळ बाजारात पांढरा कांदा पन्नास ते साठ रुपये तर लाल कांदा तीस ते चाळीस रुपये किलो विकला जात आहे. ठोक व्यापाऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली असून जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला आहे. त्यातच तेलंगणासह

इतर राज्यातील मुसळधार पावसामुळे नवे कांद्याचे पीक खराब झाले आहे. त्यामुळे दरात तेजी दिसत आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या कळमना बाजारात कांद्याची आवक कमी झालेली आहे. सणासुदीच्या काळात कांदा ६० ते ७० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड; विखे पाटील व मुरकुटे गटाला मोठा धक्का 

माय महाराष्ट्र न्यूज:राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. नियमांचा आधार आणि राजकीय कुरघोड्या करीत पदे मिळविण्यासाठीची कसरत थेट सुप्रीम कोर्टापर्यंत...

नगर जिल्ह्यात आज २४६ रूग्णांना डिस्चार्ज तर इतक्या नव्या बाधितांची भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज २४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ५२० इतकी झाली...

पेमेंटसाठी UPIचा वापर करत असाल तर सावधान! या टिप्सचा करा वापर

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडच्या काही वर्षात आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वरुपात होताना दिसत आहेत. त्यातच कोरोना महामारीच्या काळात देवाण-घेवाण आणि आर्थिक व्यवहारांसाठी बहुतांश लोक...

दिवाळीला पैसे मिळवण्यासाठी करा हे उपाय करा

माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. या दिवशी प्रभू रामचंद्र १४ वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येतील आपल्या घरी परतले....

सोयाबीनच्या दरात घसरण शेतकऱ्यांनो ‘असे’ करावे नियोजन, कृषितज्ञांचा सल्ला

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या चार दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ तर सोडाच दर स्थिरही नाहीत उलट दरात दिवसागणिक घसरण सुरु झाली आहे. ऐन रब्बीचा हंगामात शेतकऱ्यांना...

नगर ब्रेकिंग:१५ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा खून; अखेर पाच सशयीतांची डीएनए तपासणी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एका १५ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यामुळे जवळे गाव सुन्न झाले आहे. पोेलिसांची अनेक...
error: Content is protected !!