Wednesday, October 27, 2021

नगर ब्रेकिंग:विवाहित अल्पवयीन मुलीचे बालिकेसह अपहरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात मुलीची आई, पती व सासर्‍या विरोधात अत्याचार, पोक्सो, बालविवाह प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पिडीत अल्पवयीन

 मुलीला जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता तेथून तिच्यासह तिच्या बालिकेचे अपहरण झाले आहे.नगर शहरात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीचा लग्नाला विरोध असताना लग्न लावून दिल्याप्रकरणी कोतवालीत गुन्हा दाखल आहे.

इच्छा नसतानाही पतीने वेळोवेळी शरिरसंबंध ठेवले. त्याला जुगाराचा नाद असल्याने तो जुगारात पैसे हरल्यानंतर मला घरी येऊन त्रास देत, माझ्या आईला मारून टाकयची धमकी देत असल्याचे, पिडीताने फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने तिला महापालिकेच्या रूग्णालयात दाखल केले. तिने एका मुलीला जन्म दिला.

यानंतर पिडीताने चाईल्ड लाईनची मदत घेत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी या मुलीला व तिच्या बालिकेला घेऊन जिल्हा रूग्णालयात आले होते. तेथून तिच्यासह बालिकेचे अपहरण झाले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या कर्मचारी महिलेने तोफखान्यात

 फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोळुंके करीत आहे. तिच्या शोधासाठी तोफखाना पोलिसांनी पथके रवाना केली आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!