Sunday, October 24, 2021

२०००च्या नोटांवरून गांधींचा फोटो काढून टाका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसच्या एका आमदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून महात्मा गांधींचा फोटो ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवरून हटवण्याची विनंती केली आहे. या नोटा भ्रष्टाचार आणि लाचखोरीसाठी वापरल्या जात आहेत, असा त्यांचा युक्तिवाद आहे.त्यांनी याला राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान म्हटले आहे.

राजस्थानमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे लक्ष वेधून, सत्ताधारी पक्षाचे आमदार भरतसिंह कुंदनपूर म्हणाले की, जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान एकूण ६१६ भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदवण्यात आली असून, दररोज सरासरी दोन प्रकरणे नोंदवली जात आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५२व्या जयंतीनिमित्त त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून जास्त किंमतीच्या नोटांमधून महात्मा गांधींचा फोटो काढण्याचे आवाहन केले. आमदार भरतसिंह कुंदनपूर म्हणाले की, “गांधींचा फोटो फक्त ५, १०, २०, ५०, १०० आणि २०० रुपयांच्या नोटांमध्ये असावा,

कारण हे बहुतेक गरीब वापरतात आणि गांधींनी आयुष्यभर निराधारांसाठी काम केले. माझा सल्ला असा आहे की गांधींचा फोटो ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांमध्ये वापरू नये. अशोक चक्र देखील प्रभावीपणे हेतू पूर्ण करू शकते.गेल्या साडे सात दशकांमध्ये देशात सर्वत्र भ्रष्टाचार पसरला आहे. महात्मा गांधी हे

सत्याचे प्रतीक आहेत आणि गांधींचे चित्र ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवर छापलेले आहे, जे सामान्यतः भ्रष्टाचार आणि लाच देण्यासाठी वापरले जातात. भ्रष्टाचारामध्ये जास्त किमतीच्या नोटा वापरल्या जातात हा गांधींचा अपमान आहे त्यामुळे त्यांचे

चित्र ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमधून काढून टाकावे,” असे भरतसिंह कुंदनपूर यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!