Friday, October 22, 2021

एसबीआयच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; तीन दिवस ‘या’ वेळेत व्यवहार राहणार बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय स्टेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचे देखील या बँकें मध्ये खाते असेल तर बँकेने तुमच्यासाठी महत्त्वाचा मेसेज जारी केला आहे. बँकेने सांगितले की, शनिवारपासून तीन दिवस बँकेची विशेष सेवा काही तास काम करणार नाही. बँकेने ट्विट करून ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे.

तांत्रिक देखभालीसाठी बँकेच्या काही सेवा 09, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी बँकांकडून तांत्रिक सुधारणा केल्या जात असतात. जेणेकरून ग्राहकांना डिजिटल सुविधा सहज मिळतील.

एसबीआयच्या माहितीनुसार या सेवा 09 ऑक्टोबरच्या रात्री 12:20 ते 02:20 पर्यंत बंद राहतील. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11:20 ते 1:20 पर्यंत या सेवा उपलब्ध होणार नाहीत. या दरम्यान, UPI व्यवहार ग्राहकांसाठी बंद केले जातील. एसबीआयमध्ये योनोचे 3.45 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि दररोज सुमारे 90 लाख लॉगिन केले जातात. डिसेंबर 2020 च्या तिमाहीत एसबीआयने योनोच्या माध्यमातून 15 लाखांहून अधिक खाती उघडली आहेत.

दरम्यान सायबर हल्ले व डेटा चोरीच्या घटना लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. यानुसार कोणतीही ई-कॉमर्स कंपनी किंवा ऑनलाईन कंपनी तुमचा कार्ड डेटा सेव्ह करणार नाही. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना व्यवहारादरम्यान प्रत्येक वेळी कार्ड तपशील भरावा लागेल,

यासाठी टोकनायझेशन संकल्पना राबवण्यात आली. व्हिसा हा पहिला कार्ड जारी करणारा आहे, ज्याने टोकनायझेशनसंदर्भात हे पाऊल उचलले.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!