Wednesday, October 27, 2021

महाराष्ट्र हादरला! प्रियकरासोबत उभ्या असलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात कितीही कठोर कायदे केले तरी महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाही. राज्यात रोज अनेक महिला अत्याचाराच्या, लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. नागपूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील माधव नागरी भागात ही घटना घडली आहे. रात्री आठ

 वाजताच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या प्रियकरासोबत रस्त्यावर उभी होती. तिथे चार तरुण आले आणि त्यांनी पीडित मुलीसोबत मुलालाही मारहाण केली. त्याला जखमी केलं आणि त्यानंतर पीडित मुलीला शेजारच्या शेतात नेलं आणि तिच्यावर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागपुरातच काय राज्यभरात महिला कुठेच सुरक्षित नाही आहेत हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. या तरुणीवर अशा प्रकारे अत्याचार करण्यात आल्यामुळे पोलीस व्यवस्था ढिसाळ झाली आहे का? तरुणांमध्ये पोलिसांचा

 धाक उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. पालकांनी या संदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!