Wednesday, October 27, 2021

पुढच्या काही तासात राज्यातील ‘या’ भागात गडगडाटासह मुसळधार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यंदा परतीचा पाऊसामुळे राज्यातील काही प्रदेशात मुसळधार ते अतिमुसधार पाऊस सुरु आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात अधून मटंधून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह संपूर्ण राज्यात पाऊस चालु असल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.

ऐन रोपांच्या वाढीवर या पावसाचा परिणाम होऊ शकतो. दरम्यान आजही राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य, मराठवाडा भाग, पालघर, पुणे आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात मध्यम ते तीव्र ढग दिसत असून पुढील काही तासात गडहडाटासह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, पुढील काही तास या भागांतीस लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील या भागात पावसाचे ढग असणार आहेत. उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेत महत्वाच्या कामासांठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

ऑक्टोबर हीटबंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या मराठवाड्याला मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. मात्र या दरम्यान, पावसाळा संपत आल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात आकाश पूर्ण मोकळं होत जात. हवादेखील कोरडी होते.

वातावरणात धुलीकणही खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे सूर्याची किरणं थेट जमिनीवर येतात. त्यामुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याची वाफ व्हायला सुरुवात होते. या दोन्ही प्रकराच्या उष्णतेमुळे वातावरणात अचानक उकाडा जाणवायला लागतो. यालाच ऑक्टोबर हीट असे म्हणतात.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!