Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात या भागात जोरदार अतिवृष्टी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दिवसांपासून वेगवेगळ्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील पावसाची सरासरी १३९ टक्के झाली असून आतापर्यंत ६५०.३ सरासरी मिलीमीटर पाऊस झालेला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठावर राहणाऱ्या गावांना सर्तकेतचा इशारा दिला असून पूरातून वाहने न चालविण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तास चाललेल्या पावसामुळे नगर शहरातील सखल भागात पाणी साचले तर अनेक गल्ली आणि रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. पावसाचे हे पाणी चारी छोटी वाहने, रिक्षामध्ये शिरले. पावसाने नागरिकांची तारंबळ उडाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील या पावसाने हजेरी लावली.

शुक्रवारी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस वांबोरीत ७३.३ मिलीमीटर झाला असून त्या खालोखाल पोहेगावात ६५.८ मिलीमीटर झालेला आहे. यासह बेलापूर (श्रीरामपूर) २८.३, पुणतांबा (राहाता) ४१.३, मिरजगाव ४२.३ आणि माहीजळगाव ५२ (कर्जत),

चापडगाव २२.८, ढोरजळगाव २५.३ (शेवगाव), ब्राम्हणी २२ (राहुरी), तळेगाव ३९, पिंपळनेर २३.८ (संगमनेर), जेऊर २४.३ (नगर), पारनेर ३३, सुपा ५०, निघोज २६.३, पळशी २४.५ (पारनेर) यांचा समावेश आहे.

शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. यात सर्वाधिक पावसाची नोंद बांबोरी (ता. राहुरी) तर पोहेगाव (ता. कोपरगावमध्ये) झाली आहे.या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून झालेली पावसाची आकडेवारी ही ६५ मिली मीटरने पेक्षा अधिक आहे. दरम्यान,

शनिवारी जिल्ह्यात अन्य भागासह नगर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तासभर वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडात पाऊस झाला. या पावसाने शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!