Wednesday, October 27, 2021

रोहित पवार म्हणतात विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबतीला आज रोहित पवारही होते. अजितदादांच्या नियमानुसार आज सकाळीच म्हणजे सहाच्या ठोक्याला दादांनी काम सुरु केलं. दादांचं नेहमीच काम बघितलेल्या

रोहित पवारांना आज पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची भुरळ पडली.राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाच्या स्टाईलचं पुन्हा कौतुक केलं आहे. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट करत आजचा अजितदादांसोबतचा आलेला अनुभव शेअर केला आहे.

तसंच विकासाचं व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझं भाग्यच आहे, अशी कृतज्ञताही व्यक्त केली.भल्या सकाळी पावणेसहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत काम करणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे अजितदादा पवार… गेल्या तीस वर्षांपासून त्यांचा

हा शिरस्ता कायम आहे. विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही, असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय.आजही पहाटेच बारामतीत विविध कामांना भेट देऊन अजितदादांनी आढावा बैठक घेतली. विकास कामं करताना दादांचं त्यावर बारकाईने लक्ष असतं. आज मीही त्यांच्यासोबत उपस्थित होतो.

माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांसारख्या खऱ्या अर्थाने कार्यकुशल आणि विकासाचं व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझं भाग्यच आहे, असंही रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलं शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा या गोष्टी आल्याच.

नियम न पाळल्यामुळे अजित पवार यांनी बड्या-बड्या अधिकाऱ्यांना फटकारल्याचे किस्से यापूर्वीदेखील चर्चेत आले आहेत. याची प्रचिती पुन्हा एकदा बारामतीमध्ये आली. मी वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल सूचना केल्या आहेत. त्याची नोंद संबंधित विभागाने घेतली असेल. आता मी त्यावर लक्ष ठेवेल. नाहीतर एखाद्या दिवशी पहाटे

पाचलाच येऊन बघतो. काम सुरु आहे की नाही हे चेक करतो, असे म्हणत अजित पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्याचे सूचित केले. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात सीटी स्कॅन विभागाचे आज लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!