Monday, October 18, 2021

मान्सूनचा शेवटचा तडाखा होणार; येणाऱ्या 24 तासांत या जिल्ह्यांना झोडपणार पाऊस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात राज्यभर पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर, आता राज्यात मान्सूच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर देखील ओसरला आहे. आज जवळफास अर्ध्या महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी वारे गायब झाले आहेत.

त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. असं असलं तरी राज्याला शेवटचा तडाखा देण्यासाठी मान्सून सज्ज झाला आहे.हवामान खात्याने आज पुण्यासह, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित परिसरात राहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उद्यापासून राज्यात मान्सूनचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान राज्यात कुठेही पावासाचा इशारा देण्यात आला नाही. या तिन्ही दिवशी राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. शनिवारी 16 ऑक्टोबर रोजी

 मात्र विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी हवामान खात्याने नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!