Saturday, October 23, 2021

त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदी राहता येणार नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाराचे आरोप केले आहेत. अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी आणि विक्रीमध्ये घोटाळा केला आहे.

जरंडेश्वरमध्ये अजित पवार आणि त्यांच्या बहिणी मालक, भागधारक आहेत. बहिणींच्या नावे अजित पवारांनी बेनामी संपत्ती जमवली आहे. आयकर विभागाचे छापेमारी त्याच संदर्भात सुरु असून अजित पवारांनीच आता सांगावे की, बहिणींच्या घरी धाडी का टाकण्यात आल्या आहेत. अजित पवारांच्या

बहिणीचे पती मोहन पाटील जरंडेश्वर साखर कारखान्याचे संचालक आहेत. पवार कुटुंबीयांच्या अनेक बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोटाळ्याची माहिती दिली आहे. सोमय्यांनी म्हटलं आहे

की, मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटलं आहे की, जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीमध्ये घोटाळा झाला आहे. याची चौकशी झाली पाहिजे असे निर्देश महाराष्ट्र पोलीस आणि ईडीला दिली. अजित पवारांनी जरंडेश्वर कारखाना घेतला तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री,

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. या तीन आणि राज्य सरकारचे पैसेही त्यात घालण्यात आले. अजित पवारांनी स्वतःच कारखान्याची विक्री केली आणि लिलाव करुन स्वतःच विकत घेतला अशा प्रकारे उल्लंघन केले. नियमांचे उल्लंघन करुन त्यांनी स्वतःच बेनामी पद्धतीने कारखाना घेतला

 त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपदी राहता येणार नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयकर विभागाच्या छापेमारीवर प्रतिक्रिया दिली होती की, माझ्या बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. हे भाजप आणि केंद्र सरकारचे हीन दर्जाचे राजकारण आहे.

परंतु अजित पवार जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक आहेत. जरंडेश्वरमधील भागधारकांमध्ये पहिले नाव मोहन पाटील आहे. ते विजया पाटील यांचे पती आहेत. निता पाटील यांचे नाव आहे. ही सर्व मंडळी अजित पवारांच्या बहिणी आहेत. तसेच मोहन पाटील हे बहिणीचे पती आहेत. अजित पवारांनी

आता स्वतःच सांगावे की बहिणींच्या घरी धडी का टाकल्या? यामागील खरं खोटं पवारांनी सांगावं असे आव्हान किरीट सोमय्या यांनी केलं आहे

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!