Friday, October 22, 2021

नगरचे माजी पालकमंत्री म्हणतात जिल्ह्याचे विभाजन आवश्यकच

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नगर जिल्ह्याचे विभाजन करावे या मागणीचे निवेदन भाजपचे सोशल मीडिया सेल उत्तर नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. या निवेदनाची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा विभाजन व नवीन जिल्ह्याचे शिर्डी

हे मुख्यालय करण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगर विकास विभागाकडे असल्याचे सांगितले. या संदर्भात भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी आज सरकारनामाशी बोलताना महत्त्वाचे वक्तव्य केले.महाराष्ट्रात महायुती सरकारच्या काळात भाजपचे मंत्री राम शिंदे हे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

त्यावेळी त्यांनी जिल्हा विभाजनावर भाष्य केले होते. त्यानंतर हा प्रश्न अडगळीत पडला होता. भाजपने आता पुन्हा अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मी अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव राज्य शासनासमोर मांडला होता मात्र तो होऊ शकला नाही असे सांगत राम शिंदे म्हणाले,

मुख्यमंत्र्यांच्या कार्यलयाकडून जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविल्याचे कळते मात्र माझ्या मते अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावाचा नगर विकास विभागाशी संबंध येत नाही.

आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात येत असताना अहमदनगर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत नाही. याला कारण जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून भाजपच्या निवेदनावर आलेल्या उत्तरावर ते म्हणाले, माझ्या माहितीनुसार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महसूल विभाग व राज्याच्या मंत्रिमंडळाने घ्यायचा हा निर्णय आहे. माझ्या वेळेसही जिल्हा प्रशासनाने जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवला होता.

मात्र त्यावेळी जिल्हा विभाजन झाले नाही. पण जिल्हा विभाजन झाले पाहिजे, असेही राम शिंदे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!