Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील घटना:त्यांना नदीपात्रात पकडले मग काय तरुणांने उचलले हे धक्कादायक पाऊल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक तरुण आणि राहुरी तालुक्यातील एक तरुणी यांचे विद्यार्थीदशेतच सूत जमलेले होते. त्यांनी नदीपात्रात भेटण्यासाठी फोनाफोनी केली. ठरल्या वेळेप्रमाणे त्यांची नदीपात्रात भेट झाली

पण प्रवरा नदीपात्रात रात्री दोनच्या सुमारास अंधार्‍या रात्री प्रेमीयुगुलांची तरुणीच्या कुटुंबाने यथेच्छ धुलाई केली. दरम्यान, कुटुंबाने त्या तरुणीला घरी घेऊन गेल्यानंतर तरुणाने नदीपात्रातील विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र,

तेथेच वाळू उपसा करणार्‍या तस्करांनी त्या तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त करून त्याच्या घरी पाठवून दिले. ही घटना राहुरी तालुक्याच्या उत्तरेकडील प्रवरा नदीकाठच्या गावात घडली. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

याचवेळी नदीपात्रातील गोंगाटाने एव्हाना सारा गाव जागा झाला होता. नदीकिनारी बघ्यांची मोठी जत्राच भरली होती.दरम्यान, हताश झालेल्या त्या तरुणाने जवळच्याच विहिरीत आत्महत्या करण्यासाठी आपला मोर्चा वळविला. त्याचवेळी

वाळूतस्करी करताना नदीपात्रातील तमाशा लांबून पाहणार्‍या तस्करांनी त्या तरुणाचे प्रबोधन केले. नंतर त्याला त्याच्या घरचा रस्ता दाखविला. या घटनेची जोरदार खमंगपणे चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!