Friday, October 22, 2021

नगर ब्रेकींग:शेतकऱ्यांला पाठवली नोटीस पण त्यांनी घेतला गळफास..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील केसापूर येथिल शेतकऱ्यांने सहकारी संस्थेची कर्जाची नोटीस आल्यानंतर शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले. याबाबत समजलेली माहिती अशी की, केसापूर ता.राहुरी येथिल शेतकरी महादु सहादु कोतवाल वय 82 वर्ष यांनी दोन दिवसापुर्वी केसापूर सोसायटीचे थकीत कर्ज भरण्या संदर्भात पोष्टाने नोटीस मिळाली होती.

दोन दिवस कर्ज कसे फेडायचे याच विवंचेत ते होते. मंगळवारी राञी उशिरा हा शेतकरी घरा बाहेर पडला. बाहेर पडण्यापूर्वी सोसायटीच्या कर्जाच्या नोटीसाच्या पाठीमागिल बाजुस मी आत्महत्या करत आहे.

माझ्या आत्महत्येला घरातील कोणालाही जबाबदार धरु नये मला सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न असल्याने कर्जापायी मी जीवनयाञा संपवत आहे.अशी चिठ्ठी लिहुन राञी आत्महत्या केली आहे.

साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहीनीचे चालक रवि देवगिरे व देवळाली प्रवरा पोलीस चौकीचे पोलीस यांनी मृतदेह खाली उतरुन राहुरी ग्रामिण रुग्णालयात दाखल केला परंतू वैद्यकिय सुञाने मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन आकस्मत मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!