Wednesday, October 27, 2021

चित्रा वाघ पुरुषांना ब्लॅकमेल करतात ;यांनी केला गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती फायनल मानली जात आहे.निवड होण्यापूर्वीच अध्यक्षपदावरुन राष्ट्रवादी विरुद्ध भाजप महिला नेत्यांमध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राणवाला मदत करणारी शूर्पणखा त्याठिकाणी बसवू नका असं ट्विट केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

 वाघ यांची अवस्था म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी झालेली आहे. जोरजोरात उड्या मारायच्या आणि द्राक्षाच्या घडापर्यंत उडी जात असतानाच द्राक्ष आंबट आहे असं म्हणायचं अशी जोरदार टीका विद्या चव्हाण यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज राहिल्या असत्या तर त्यांना आज काय काय

पदं मिळाली असती याची त्यांना आठवण झाली की त्यांना वाईट वाटतं. आणि म्हणून कोणाला तरी शूर्पणका म्हणायचं. आता शूर्पणखा काय वाईट होती का? ती पण एक महिला होती. त्यामुळे एका महिलेने दुसऱ्या महिलेला असं बोलणं बरोबर नाही, असं उत्तर विद्या चव्हाण यांनी दिलं आहे.

त्यांच्या आतापर्यंतच्या प्रेस कॉन्फरन्स बघितल्या तर त्या सर्रास ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरु आहे. आणि हे तंत्र त्यांना चांगलंच अवगत झालं आहे. भाजपाच्या एका आमदाराला ब्लॅगमेलिंग करण्याच प्रयत्न त्यांनी केला होता. त्या जेव्हा महिला आयोगाच्या सदस्या होत्या आणि त्यांना त्यातलं कळायला

लागल्यानंतर त्यांनी हा प्रकार सुरु केला असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.भाजपाला आज बरं वाटतं कारण त्या दुसऱ्यांवर आरोप करतायत. पण भाजपाच्या आमदारांवर पण त्यांनी अशा प्रकारचे आरोप केले. याला बघून घेते, त्याला बघून घेते, अशा प्रकारच्या धमक्या त्या देतात. हे असे प्रकार थांबले पाहिजेत

असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत असा सल्लाही विद्या चव्हाण यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!