Monday, October 25, 2021

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करताय?; मग जाणून घ्या सोन्याचा आजचा दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हिंदू संस्कृतीमध्ये ‘दसऱ्या’ला विशेष महत्व आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जात असल्याने, कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात या दिवसापासून करतात. तसेच सोने-चांदी, नवीन वाहन, घर अशा गोष्टी

घेण्यासही या दिवसाला प्राधान्य दिले जाते. नवरात्रीत सोन्याच्या किंमतीत कोणतीही लक्षणीय वाढ झाली नव्हती, परंतु नवरात्री संपताच सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. आज दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा दर 500 हून अधिक रुपयांनी वाढला आहे.

सणासुदीच्या काळात मुंबई सराफा बाजारात, 15 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याची किंमत 24 कॅरेट सोन्यासाठी 47,970 रुपये 10 ग्रॅम इतकी आहे. सोबतच 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,970 रुपये 10 ग्रॅम इतकी आहे. त्याचबरोबर एक किलो चांदी आज 63,200 रुपयांना विकली जात आहे. चांदीच्या किंमतीमध्ये

जवळजवळ 1100 रुपयांनी वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांदी 60 हजाराच्या घरात होती, अवघ्या काही दिवसांमध्ये यामध्ये 3 हजाराहून अधिक वाढ झाली आहे.पुण्यात हे दर, 24 कॅरेट 1 तोळा सोन्यासाठी 49,350 तर 22 कॅरेट 1 तोळा सोन्यासाठी 47,800 इतके आहेत.

पुण्यात आज चांदी 63,200 रुपये किलो या दराने विकली जात आहे.हे वरील सोन्याचे व चांदीचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा. दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्हाला वैयक्तिक वापरासाठी सोने घ्यायचे असेल,

तर 22 कॅरेट शुद्धतेचे सोने दागिने तयार करण्यासाठी उत्तम आहे. यामध्ये सोने, चांदी, निकेल आणि धातू वापरले जातात. इतर धातूंचे मिश्रण सोने अधिक कडक आणि दागिन्यांसाठी योग्य बनवते.जर का तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर 24 कॅरेट सोने हा उत्तम पर्याय आहे. हे सोने शुद्ध स्वरूपाचे मानले जाते.

शुद्ध सोने किंवा 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्धता दर्शवते. यामध्ये इतर कोणतेही धातू नसतात. 24 कॅरेट सोन्याचा वापर सोन्याची नाणी, बार इत्यादी करण्यासाठी केला जातो.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!