Saturday, November 27, 2021

नगर ब्रेकींग:त्यांचे महिलेसोबतचा फोटो तयार करून तिच्याशी अनैतिक संबंध ? ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका महिलेसोबतचा फोटो तयार करून तिच्याशी तुमचे अनैतिक संबध आहेत. अशी बदनामी करू म्हणुन वारंवार पैशाची मागणी होत असल्याने देवटाकळी येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. 16 रोजी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान घडली.

संभाजी साहेबराव खरड (वय 55, रा. देवटाकळी, ता. शेवगाव) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात भाऊराव उर्फ मधुकर पोपट वाघमारे, शरद आण्णा वाघमारे व कैलास रतन वाघमारे (तिघे रा. देवटाकळी, ता. शेवगाव) अशा तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महेश संभाजी खरड (रा. देवटाकळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील भाऊराव वाघमारे, शरद वाघमारे व कैलास वाघमारे या तिघांनी संभाजी साहेबराव खरड यांचा फोटो एका महिलेच्या फोटोशी जोडून तुमचे या महिलेशी अनैतिक संबध आहेत. तुमची सर्वत्र बदनामी करू असे म्हणत मागील तीन महिण्यापासून त्रास देत सुमारे चार लाख रुपये उकाळले आहेत.

आता पैसे दिले आहेत, यापुढे बदनामी करू नका असे सांगितले होते.मात्र तरीही वरील तिघांनी पंधरा दिवसापुर्वी पुन्हा आठ लाख रुपयांची मागणी करत पैसे दिले नाहीतर बदनामी करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच काही दिवसापुर्वी देवटाकळी ग्रामपंचायतीसमोर संभाजी खरड यांना

भाऊराव वाघमारे यांनी लोखंडी गजाने मारहाण केली होती. या मारहाणीत संभाजी खरड यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते.या तिघांकडून पैशाची मागणी करत बदनामीची धमकी देण्यात येत होती. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून संभाजी खरड यांनी शनिवार दि. 16 रोजी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान संभाजी खरड यांनी घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना सकाळी लक्षात आल्यानंतर संभाजी खरड यांना शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी संभाजी खरड हे मयत झाल्याचे सांगितले.याप्रकरणी वरील तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत संभाजी खरड यांच्या

कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. यानंतर पोलिसांनी सर्व घटनेचा तपशील घेतल्यानंतर वरील तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!