Monday, December 6, 2021

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आलेल्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात घमासान सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक शब्दात टीका केली.अपेक्षाभंग झाला की दुःख होणं साहजिकच असतं आणि ते दुःख, ती सल कायम मनाला हतबल करते आणि ही हतबलता सहन न झाल्यास काहीजण मग तोल ढळल्यासारखं बडबडतात. असंच काहीसं

भाजपच्या नेत्यांच्या बाबतीत होताना दिसत आहे. जे पन्नासहून अधिक वर्षे संसदीय राजकारणात काम करत आहेत त्या शरद पवार साहेबांबत भाजपाचे काही स्वयंघोषित वरिष्ठ नेते एकेरी उल्लेख करू लागले यात त्यांची चूक नाही, तर हे सत्ता जाण्याचं दुःख आहे आणि ते समजू शकतो, परंतु या पातळीपर्यंत दुःख होईल ही

अपेक्षा नव्हती. स्व. प्रमोद महाजन, स्व. मुंडे साहेब, स्व. वाजपेयी साहेब यांच्यासह अडवाणी जी यांनी हयातभर विरोधी पक्षात राजकारण केलं, मात्र त्यांचा तोल कधी ढळला नाही. महाराष्ट्रात मात्र काहींना सत्तेचा दुरावा सहन होत नसल्यामुळे असं होत असावं” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवारांनी भाजपावर केंद्रत सत्तेत आल्यापासून बिगर भाजपशासित राज्यांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप केला आहे. रोहित पवार म्हणाले, “कृषी, उर्जा, धरणे, आर्थिक अधिकार याचंही केंद्रीकरण केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमकं याच मुद्द्यांवर बोट ठेवलं. शेजारच्या राज्याला वादळात

 मदत करण्यासाठी तातडीने एक हजार कोटी रुपये मिळतात. आपल्या राज्याला मात्र एक कवडीही दिली जात नाही. स्वतःची तिजोरी भरण्यासाठी राज्यांना मिळणारे कर कमी करून सेस वाढवले जातात. ही कोणती संघराज्य पद्धती? या नेत्यांनी एकदा संविधानात डोकावून बघितलं तर त्यांना संघराज्य पद्धतीचा अर्थ नक्कीच समजेल.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:नगर जिल्ह्यातील या बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर अर्बन को ऑप बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून नवीन संचालक मंडळाने कारभार हाती घेतला आहे. मात्र आता रिझर्व्ह बँकेचे अर्बन...

चिंता वाढली! महाराष्ट्रात इतक्या लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण

माय महाराष्ट्र न्यूज:ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक गटाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लहान मुलांच्या...

या अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो

माय महाराष्ट्र न्यूज:एका अभिनेत्री आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड...

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...
error: Content is protected !!