Friday, December 3, 2021

मोहटादेवीच्या पालखी सोहळ्यात पोलिसांना धक्काबुक्की ;१० ते 15 जणांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मोहटादेवीच्या पालखी सोहळ्याच्या वेळी पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला असून या संदर्भात पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन आरोपींसह इतर दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तीविरोधात

शासकीय कामात अडथला आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मोहटे गावात घडली आहे.तालुक्यातील मोहटा गावातील हनुमान मंदीरासमोर जिल्हाधिकारी यांच्या कोरोना

संबंधाने गर्दी होवू नये याकरीता जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून लोकांनी एकत्र येवून मिरवणूक काढली. मिरवणुकीत बँड व इतर वाद्य वाजवून 50 ते 100 लोकांची गर्दी जमवली व ती गर्दी काढण्यासाठी पोलीस गेले असता आरोपी महादेव आसाराम दहिफळे व विठ्ठल आसाराम दहिफळे यांनी

 पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण व इतर पोलीस कर्मचार्‍यांना आम्ही येथून जाणार नाही व कोणालाही जाऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला कोण आडवणार, असे म्हणून चव्हाण व इतर पोलीस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली.याबाबत अधिक माहिती अशी की, मोहटादेवी गडावरील शारदीय नवरात्र उत्सव संपल्या नंतर

मोहटादेवीची मोहटे गाव ते देवीगड अशी मिरवणूक काढण्यात येत असते. त्याप्रमाणे काल रात्री ही मिरवणूक काढण्यास सुरवात झाली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी पोनि. सुहास चव्हाण, सपोनि. रामेश्वर कायंदे, प्रवीण पाटील हे मोहटादेवी गड पायथ्याला फौजफाटा घेऊन

 गेले असता त्या ठिकाणी जवळपास 100 जण बँडच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले. यामुळे पोनि. चव्हाण यांनी पोलीस गाडीच्या स्पीकर वरून जिल्हाधिकार्यांनी जमावबंदी आदेश लागू केला असल्याने मोठ्या संख्येने थांबलेल्या लोकांनी निघून जावे. तसेच करोना नियमाचे पालन करावे. असे आवाहन केले

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!