Saturday, November 27, 2021

नगरमधील १३ वर्षीय मुलावर लष्करी अधिकार्यांकडून अनैसर्गिक कृत्य आरोपीला अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लष्कराचा गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीने एका 13 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केले होते. पीडित मुलाने घरच्यांना ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिसांना ही माहिती दिली. पीडित मुलाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट दिली होती.सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले होते. तपासात सदर व्यक्ती लष्करी अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले.

अनैसर्गिक कृत्य करणार्‍या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली. सुखदेवरामा गणेशारामा (वय 45 रा. नागोरी, राजस्थान) असे अटक केेलेल्या आरोपीचे नाव आहे. तो लष्करी अधिकारी असल्याने लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी पोलिसांनी चर्चा केली.

गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांनी लष्करी अधिकार्‍यांना दाखविल्यानंतर त्यांनी सुखदेवरामा याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!