Friday, December 3, 2021

चार लाखांच्या भांडवलात ‘हा’ व्यवसाय सुरु करा; महिन्याला पैसाच पैसा कमवा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनामुळे नोकऱ्या आणि थेट लोकांशी संबंध येणाऱ्या उद्योगांविषयी अनिश्चिततेचे वातावरण आहे. एखादं दुकान टाकायचं म्हटलं तर कोरोनाची लाट पुन्हा आल्यास सरकार कधी आणि कितीवेळा लॉकडाऊन लावेल, याचा नेम नाही. अशा परिस्थितीत बंद जागेत राहूनच एखादा उद्योग करणे हे फायद्याचे ठरेल.

कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे कांद्याच्या पेस्टची मागणी वाढते. बाजारपेठेतील मागणीमुळे कांद्याची पेस्ट बनवण्याचा व्यवसाय चांगला चालू शकतो. सुलभ तंत्रज्ञानामुळे, कोणीही त्याचे युनिट सेट करू शकतो आणि या व्यवसायातून चांगले पैसे कमवू शकतो.

बाजारात किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे किरकोळ बाजारातही त्यांच्या किमतींवर परिणाम झाला आहे. जर तुमचाही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची योजना असेल तर तुम्ही कांदा पेस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.खादी ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) कांदा पेस्ट बनवण्याच्या

 व्यवसायाचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यानुसार या व्यवसायासाठी 4.19 लाखांचे भांडवल लागते. जर तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही सरकारच्या मुद्रा योजनेतून कर्ज घेऊ शकता.कांदा पेस्ट उत्पादन युनिट उभारण्यासाठी एकूण खर्च 4,19,000 रुपये आहे.

यामध्ये 1 लाख रुपये बिल्डिंग शेड बांधण्यासाठी आणि 1.75 लाख रुपये उपकरणांसाठी (तळण्याचे पॅन, ऑटोक्लेव्ह स्टीम कुकर, डिझेल भट्टी, स्टरलायझेशन टाकी, लहान भांडी, मग, कप इ.) खर्च होतील. तसेच दैनंदिन खर्चासाठी 2.75 लाख रुपये आवश्यक असतील.

कांद्याची पेस्ट बनवण्याच्या व्यवसायावर तयार केलेल्या अहवालानुसार, तुम्ही एका वर्षात 193 क्विंटल कांदा पेस्ट तयार करू शकता. 3,000 रुपये प्रति क्विंटलच्या हिशेबाने त्याची किंमत 5.79 लाख रुपये असेल.जर तुम्ही पूर्ण क्षमतेने कांद्याची पेस्ट तयार केली तर एका वर्षात तुम्ही 7.50 लाख रुपयांची विक्री करू शकता.

जर यातून सर्व खर्च वजा केले तर ग्रॉस सरप्लस 1.75 लाख रुपये होईल. तर निव्वळ नफा साधारण 1.48 लाख रुपये असू शकतो. जर तुम्ही भाड्याच्या जागेऐवजी तुमच्या घरात हा व्यवसाय सुरू केलात तर तुमचा नफा आणखी वाढेल.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!