Wednesday, December 8, 2021

अध्यात्माने मनशांती प्राप्त होते-पो.नि.बाजीराव पोवार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

गावातील मंदिरे-अध्यात्मिक कार्यामुळे सकारात्मक विचार निर्माण होतात,घरा-दारात चैतन्य येते. व्यसनापासून दूर रहाण्याची प्रेरणा मिळून मनशांती प्राप्त होते असे प्रतिपादन नेवासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार

तालुक्यातील गोंडेगाव येथील शनिमंदिर प्रांगणात पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे हस्ते रेणुकादेवी पालखी अर्पण कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते.ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष माजी आमदार
पांडुरंग अभंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे,माजी उपसभापती काशिनाथ नवले,बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे, तुकाराम मिसाळ,भागचंद महाराज पाठक,माई महाराज,रामकृष्ण नवले,सरपंच किशोर शिरसाठ,अनिल लहारे,सिद्धांत नवले व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री.पोवार पुढे म्हणाले,गावात,घरात तंटे होणे हे निकोप लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही.पोलीस स्टेशन-कोर्ट कचेऱ्या यात वेळ आणि पैसा खर्च होत असल्याने गावातील तंटे शक्यतो गावातच मिटवावेत.प्रत्येक गावात दुष्ट प्रवृत्तीचे दोन टक्के माणसं ही असतातच,ती सर्व गाव अशांत करत असतात.हे कायद्याचे राज्य आहे,त्यामुळे अशा लोकांचा बंदोबस्त कायद्यानेच करू.गावात महिला आत्याचार-छेडछाडीचे प्रकार घडत असतील तर आमच्याशी संपर्क करावा,त्याचा ही बंदोबस्त करू.

मटका-गुटका आणि दारू-वाळू वाल्यांना सरळ करू…

जगण्यासाठी माणसांच्या फार मर्यादित गरजा आहेत,त्या पूर्ण करण्यासाठी उलटे धंदे करण्याची गरज नाही.तालुक्यातील अवैध धंदे ही बंद करू. मटका-गुटका आणि दारू-वाळू वाल्यांना नीट आणि सरळ करू.
बाजीराव पोवार
पोलीस निरीक्षक, नेवासा

माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले, समाजात एकोपा निर्माण करून मनातील विकार दूर करण्यासाठी मंदिरांची गरज आहे.मंदिरामधून मानवतेची पूजा व्हावी.अहंकार दूर करून नम्रतेचा अंगीकार केला पाहिजे. घर, अंगण,गाव आणि त्याच बरोबर प्रत्येकाने आपले मन ही स्वच्छ ठेवले पाहिजे.

सभापती श्री.कांगुणे म्हणाले, ना.शंकरराव गडाख,जिल्हा परिषद अध्यक्षा ना.राजश्रीताई घुले,अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख यांचे सहकार्याने गोंडेगाव रेणुकामाता मंदिराचा क-वर्ग तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश केला जाईल.

यावेळी तुळशीराम तुपे,फक्कडराव वाघुले,सरपंच बाबासाहेब रोडगे,माई महाराज,सुसे गुरुजी,दत्तात्रय शेजुळ, ग्रामसेवक अशोक शिंदे, अण्णासाहेब वाघुले, संतोष गरुडे,पांडुरंग रोडगे, भाऊसाहेब चौधरी, सर्जेराव पवार,कल्याण शेजुळ,अमोल गरुडे, बापूसाहेब वाघुले,रंगनाथ शेजुळ,देवराव रोडगे,दामोदर सुसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.मुख्यापक संदीप फुलारी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

 

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!