Saturday, November 27, 2021

पुढील पाच दिवस राज्यात पावसाचं असा आहे इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:सध्या बहुतांशी राज्यांतून मान्सून परतला असला तरी, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर भारत आणि ईशान्यकडील राज्यांत अद्याप मान्सूनचा पाऊस कोसळत आहे.

आज उत्तर प्रदेशासह, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशातील काही जिल्हे आणि ईशान्यकडील सर्व राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सध्या सौम्य झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या तीन दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील

अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. याचा सर्वाधिक फटका उत्तरेकडील जिल्ह्यांना बसला आहे. नाशिक आणि अकोला जिल्ह्यात कोसळलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे.

परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून नेला आहे. असं असलं तर आता महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाचं कडकडीत लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती हवामान

विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उर्वरित काम करता येणार आहेत. पुढील पाचही दिवस राज्यात हवामान खात्याने कोणताही इशारा दिला नाही. सर्वत्र कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पावसाच्या सरी कोसळू शकतात.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!