माय महाराष्ट्र न्यूज:जुन्या पेन्शनसाठी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि महसूलच्या 15 हजारांहून अधिक कर्मचाऱयांना व्हॉट्सऍपद्वारे
कामावर हजर होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कामावर हजर न होणाऱया कर्मचाऱयांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, या नोटिसांमुळे महसूल कर्मचाऱयांमध्ये तीव्र नाराजी असून, कर्मचाऱयांनी काळे कपडे घालून प्रशासनाचा निषेध नोंदवला.व्हॉट्सऍप आणि ऑफलाइन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या 14 हजार 194, तर महसूल विभागाच्या 950 कर्मचाऱयांना नोटिसा
बजावण्यात आल्या आहेत. यांसह गैरहजर असणाऱया सर्व शासकीय कर्मचाऱयांना कामावर हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. 721 माध्यमिक आणि प्राथमिक शाळा सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या
वतीने देण्यात आली आहे.या नोटिसांत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 मधील तरतुदीनुसार भंग केल्याने आपणाविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही का करू नये. शासनाचे ‘काम नाही, तर वेतन नाही’ नुसार आपण संपात सहभागी
असल्यामुळे आपले वेतन कपात का करू नये, याबाबत आपला खुलासा विनाविलंब त्वरित सादर करावा, तसेच आपला संप हा बेकायदेशीर असून, नोटीस मिळताच कामावर हजर व्हावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशा आशयाच्या
सीईओंच्या स्वाक्षरीने गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदीसह सर्व विभागप्रमुखांच्या माध्यमातून कर्मचार्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
10 हजार गुरुजींना ईमेलवर बजावल्या नोटिसा.1050 ग्रामसेवकांना बीडीओंकडून नोटीस.नोटीस बजाविण्यासाठी ईमेल, व्हॉटस् अॅपचा वापर