Monday, December 6, 2021

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका मुलीचा प्रेमात आकंठ बुडाला. मात्र ती मुलगी बुध्दीमान निघाली.

‘तुला सरकारी नोकरी मिळाली तरच मी तुझ्याशी लग्न करील, तेव्हा तू सरकारी नोकरीसाठी प्रयत्न कर. अन्यथा माझे आईवडील माझं तुझ्याऐवजी सरकारीअसलेल्या दुसर्‍याच मुलाशी लावून देतील’, अशी तंबीच त्या मुलीने या आंधळ्या प्रेमविराला दिली.

मग काय, त्याच्या मनात एकच, कसंही करुन लष्करात नोकरी मिळाल्याचं त्या मुलीला खोटं पण रेटून बोलत सांगायचं या पठ्ठ्यानं ठरविलं. यासाठी त्याने भिंगारमधून फौजी जवानाचा गणवेश खरेदी केला, तो परिधान केला आणि त्या मुलीला व्हिडिओ काॅल केला.

तरीही त्या बुध्दीमान मुलीचा विश्वास बसला नाही. तिने त्याला सांगितले, ‘तू मिल्ट्री एरियामध्ये जाऊन व्हिडिओ काॅल कर’. त्या आंधळ्या प्रेमविरानं तसंच केलं आणि तिथंच तो फसला. लष्करी अधिकारी आणि जवानांनी पकडलं.

त्या आंधळ्या प्रेमविराकडे कुठलंही ओळखपत्र नसल्यानं लष्करी अधिकार्‍यांना तो संशयित दहशतवादी वाटला. लष्करी अधिकार्‍यांनी त्या प्रेमविराला लष्कराच्या खास तुरुंगात ठेवलं आणि त्याची ‘कसून’ चौकशी केली. मात्र स्वत:ची ओळख

पटविण्यात तो असफल ठरला आणि लष्करी अधिकार्‍यांनी दहशतवादी सापडल्याचा भिंगार कँप पोलिसांनीना फोन केला.भिंगार कॅप पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आंधळ्या प्रेमविराला पोलीस ठाण्यात

आणलं गेलं आणि ‘पोलीसी खाक्या’ दाखवताच तो पोपटासारखं बोलू लागला.उत्तर नगर जिल्ह्यातल्या लोणीचा राहणारा तो तरुण चांगल्या घरचा आहे. मात्र प्रेमात आंधळा झाल्यानं त्या तरुणानं हे पाऊल उचललं. सरकारी नोकरी नाही आणि जिच्यावर

प्रेम जडलं तिनं तर पहिली अट सरकारी नोकरी असल्याची ठेवली. त्या मुलीची ती अट पूर्ण करण्यासाठी या प्रेमविरानं लष्करातला ‘मुन्नाभाई’ बनायचं ठरविलं आणि शेवटी तो दहशतवादी बनून गजाआड गेला.

विशेष म्हणजे लष्करात नोकरी लागल्याची त्या प्रेमवेड्याने मित्रांंना पार्टीदेखील दिली. त्या मुलीला ‘इंप्रेस’ करण्यासाठी आणि तिचं प्रेम प्राप्त करण्यासाठी वाट्टेल करण्याची त्या प्रेमवेड्यानं तयारी केली. मात्र हाय रे कर्मा! नशिबानं त्याला दगा दिला आणि त्या

मुलीसोबत संसाराच्या बेडीत अकडण्याऐवजी त्या प्रेमवेड्या तरुणाला कायद्याच्या आणि पोलिसांच्या बेडीत अडकावं लागलं. शेवटी ‘प्रेम आंधळं असलं तरी प्रेमात एवढं आंधळं व्हायचं नसतं’, हे खरं ठरलं.

ताज्या बातम्या

चिंता वाढली! महाराष्ट्रात इतक्या लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण

माय महाराष्ट्र न्यूज:ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक गटाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लहान मुलांच्या...

या अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो

माय महाराष्ट्र न्यूज:एका अभिनेत्री आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड...

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...
error: Content is protected !!