Saturday, June 10, 2023

देडगावकर नेहमीच आमच्या पाठीशी-सुनिताताई गडाख

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

नेवासा

देडगावकर नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहते, आ. शंकरराव गडाख हे ही कायम आपल्या सेवेसाठी तत्पर राहतील अशी ग्वाही नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुनिताताई गडाख यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे माजी मंत्री आमदार शंकररावजी गडाख साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून 71 लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मा.सभापती सुनीताताई शंकरराव गडाख यांच्या हस्ते पार पडला.त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुखदेव महाराज मुंगसे होते. कार्यक्रमास अनिलराव अडसुरे ,माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे ,माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मणआबा पांढरे, मुळा बँकेचे अध्यक्ष माणिकराव होडे, महेश निकम, इंजिनीयर देशमुख, माजी उपसभापती कारभारी चेडे , कडूभाऊ तांबे, प्रगतशील बागातदार चंद्रभान कदम, लक्ष्मणराव बनसोडे ,बाबासाहेब मुंगसे , बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके,महादेव मुंगसे , अड.गोकुळ भताने ,निवृत्ती मुंगसे, संजय मुंगसे, अरूण बनसोडे, किशोर मुंगसे, सागर मुंगसे, शिवाजी काजळे ,गणेश औटी, दिलदार सय्यद, रामेश्वर गोयकर , योसेफ हिवाळे, कडू भाऊ दळवी , जालूनाना चांदघोडे ,विकास राजळे ,गणेश लोंढे, अशोकराव मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे ,विश्वस्त सुभाष मुंगसे, किशोर वांढेकर, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थ व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार युनूस पठाण यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत सदस्य अशोकराव मुंगसे यांनी आभार मानले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!