माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसापासून २ हजार रुपयांच्या नोटांवरुन चर्चा सुरू आहेत, देशातील बँकांना एटीएममध्ये न भरण्याच्या
सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावर आता संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खुलासा केला आहे. एटीएम मशिनमध्ये २,००० रुपयांच्या नोटा भरणे किंवा न भरण्याबाबत बँकांना कोणतीही
मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली नाहीत, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितले. किती रुपयांच्या नोटा कॅश व्हेंडिंग मशीनमध्ये ठेवायच्या हे बँका स्वतः ठरवतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार,
मार्च २०१७ अखेर आणि मार्च २०२२ अखेरीस ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ९.५१२ लाख कोटी रुपये आणि २७.०५७ लाख कोटी रुपये होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत
एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.एटीएममध्ये २,००० रुपयांच्या नोटा न भरण्यासाठी बँकांना कोणतीही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेली नाही. बँका एटीएममधील रकमेचे मूल्यांकन करतात आणि मागील वापराच्या आधारावर कोणत्या नोटांची जास्त गरज आहे.