माय महाराष्ट्र न्यूज:शक्यता आहे. खाण्यापिण्याबरोबरच आता ढाब्यावर पेट्रोल पंपाची देखील सुविधा मिळू शकते. केंद्रीय मत्री नितीन गडकरी यांनी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना या योजनेवर काम करण्यास सांगितले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी
सोमवारी त्यांच्या अधिकाऱ्यांना यावर काम करण्यास सांगितले आहे.एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की या योजना पुरवण्यासाठी उशीर होऊ नये याकरता सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे.
त्यांना एका व्यक्तीने मेसेज करत अशी तक्रार केली होती ती प्रवासादरम्यान 200-300 किलोमीटरवर एकही शौचालय आढळले नव्हते. हा किस्सा सांगताना त्यांनी या योजनेबाबत माहिती दिली.गडकरी असं म्हणाले कीस त्यांनी MoRTH च्या त्यांच्या अधिकाऱ्यांना असे म्हटले
की ज्याप्रमाणे NHAI पेट्रोल पंपासाठी एनओसी देते, त्याचप्रमाणे आपल्याला राष्ट्रीय महामार्गावर छोटे ढाबा मालकांना पेट्रोल पंप आणि शौचालय उघडण्यासाठी परवानगी देण्यावर विचार करायला हवा.
गडकरी असं देखील म्हणाले की, अनेक लोकं रस्त्यालगतच्या जमिनींवर अतिक्रमण करत आहेत, ढाबे उघडत आहेत ज्यामुळे ट्रक चालक रस्त्यावर ट्रक पार्क करतात. या कृतीमुळे उपद्रव होत आहे. छोट्या ढाब्याच्या मालकांना पेट्रोल पंप उघडण्याची मंजुरी
देण्यावर विचार मंत्रालय विचार करू शकते, जेणेकरून 5-10 वाहनं पार्क करण्याची सुविधा आणि शौचालयाची सुविधा देता येईल.