माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांतच दिवाळी सुरू होणार आहे. याकाळात सोन्याचांदीच्या किंमतींत चढउतार सुरू आहे. अशावेळी तुम्ही सोनंखरेदीचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे. आज सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 8059 रुपयांनी कमी आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.12 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात 0.29 टक्क्यांची घसरण झाली आहे.2020 बद्दल बोलायचे झाल्यास, गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200
रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. MCX वर आज डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत सोने 48,141 रुपये प्रति तोळावर आहे. म्हणजेच आज सोने सुमारे 8059 रुपयांनी स्वस्त आहे.
आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.12 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर 48,141 रुपये प्रति तोळावर आहेत. चांदीच्या दरात 0.26 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. यानंतर चांदी 65,964 रुपये प्रति किलोवर आहे.
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’ च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर
त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.