Saturday, January 22, 2022

आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; कांदा 3 हजारच्या खाली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: कांदा हे पैसे देणारे पीक आहे. कधी ग्राहकांच्या डोळ्यात तर कधी शेतकरी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या पीकाच्या दराबद्दल अनिश्चितता आहे.चार दिवसांपूर्वी कांद्याचे दर 3 हजाराहून अधिकचा दर मिळालेला होता. 

मात्र, मंगळावारपासून दरात कमालीची घट होत आहे. त्यामुळे वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता पण आता दिवसेंदिवस दर घटत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे.कांद्याचे सर्वात मोठा उत्पादक महाराष्ट्रात आहेत.

दोन दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घट होत आहे.दरात अशीच घसरण राहिली तर ग्राहकांना लवकरच महागड्या कांद्यापासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. आशियातील सर्वात मोठ्या मंडई असलेल्या लासलगावला मंगळवारी किमान

85 रुपये तर जास्तीत जास्त 3231 रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण दर हे 2750 रुपये प्रति क्विंटल होती.कोणत्याही शेतीमालाची आवक वाढली की, दर घसरतात हे बाजारपेठेचे सुत्रच आहे. त्यामुळे मध्यंतरी दर वाढल्याने केवळ राज्यातूनच नाही तर परराज्यातूनही कांद्याची आवक वाढलेली आहे.

आवक वाढल्याने मागणी कमी झाली आहे. त्यामुळे देखील दर घसरले असल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत डिगोले यांनी सांगितले आहे. शिवाय ही घसरण काय कायम राहणार नाही. जुना कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक नाही. त्यामुळे थोड्या दिवसांमध्ये पुन्हा दर वाढणार आहेत.

एप्रिल-मे मध्ये साठवलेले कांदे पाऊस आणि पुरामुळे सडले आहेत. यावर्षी मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूर आदी ठिकाणी ठेवलेल्या कांद्याला ओला झाल्याने सडलेला आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, सोलापूर आणि जळगावमध्येही

अनेक शेतकऱ्यांचे कांदे सडले आहेत. ज्यामुळे काही दिवसांत किंमत वाढेल. शेतकरी संघटना 30 रुपये किलो भावाची मागणी करत आहेत.25 ऑगस्ट रोजी किमान दर 600, सर्वसाधरण किंमत 1551 होती तर कमाल दर 1781 रुपये प्रति क्विंटल होती.3 सप्टेंबर, किमान दर 500, सर्वसाधारण किंमत

1540 रुपये आणि कमाल 676 रुपये प्रति क्विंटल होती.2 ऑक्टोबर रोजी किमान किंमत 1000 रुपये, सर्वसाधारण किंमत 2970 रुपये आणि कमाल 3101 रुपये प्रति क्विंटल होती.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!