Monday, July 4, 2022

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना :वडिलांचा मुलाने केला खून

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गाय पिळण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याने मध्यस्थी करण्यास गेलेल्या वयोवृद्ध वडिलांना त्यांच्याच मुलाने बांबूने जबरदस्त मारहाण केली. त्यातच वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे दि. 27 ऑक्टोबर रोजी घडली.

घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ गजाआड केले.या घटनेतील मयत विठ्ठल तुळशीराम हारदे (वय 72 वर्षे) हे राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे हा क्षुल्लक कारणावरून

नेहमी भांडणे करीत असे. दि. 27 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास यातील आरोपी ज्ञानेश्वर हारदे हा दारू पिऊन घरी आला होता. त्याचे व त्याची पत्नी सविता यांच्यात गाय पिळण्याच्या कारणावरून भांडण चालू होते.त्यावेळी त्याचे वडील विठ्ठल तुळशीराम हारदे हे आरोपी ज्ञानेश्वर हारदे यास

म्हणाले, तू नेहमीच दारु पिऊन क्षुल्लक कारणावरून भांडण करतो, असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने तो त्याचे वडील विठ्ठल हारदे यांना म्हणाला, तुम्ही नेहमीच माझ्या कामात अडथळा आणता. आज तुम्हाला संपवून टाकतो, असे म्हणून जवळच पडलेला बांबू घेऊन आरोपीने विठ्ठल हारदे यांना बांबूने जबरदस्त मारहाण करून जखमी केले.

विठ्ठल हारदे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव,

निरज बोकील आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन गजाआड केले. सर्जेराव महिपती हारदे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे याच्या विरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!