माय महाराष्ट्र न्यूज:डिस्पोजेबल केटरिंग उत्पादन युनिट. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन लाखांच्या भांडवलाची गरज लागेल. मात्र, व्यवसायाने वेग पकडल्यानंतर तुम्ही त्यामधून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करु शकता.
डिस्पोजेबल केटरिंग उत्पादनांची मागणी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात आहे. ग्रामीण भागात पेपर प्लेट्सना जास्त मागणी असते. यासाठी छोट्या मशिनच्या साह्याने काम करता येते. पेपर कप-प्लेट ऑटोमॅटिक मशीनची बाजारातील किंमत 2 ते 3 लाख रुपये आहे.
मशीन घेतल्यानंतर, तुम्हाला कच्चा माल घ्यावा लागेल, त्यानंतर तुम्ही काम सुरू करू शकता.उत्पादन सुरू केल्यानंतर, तुम्हाला चांगले मार्केटिंग देखील करावे लागेल. जेणेकरुन अधिकाअधिक विक्रेत्यांना तुमचे उत्पादन माहिती होईल.थर्माकॉल प्लेट तयार करायच्या ठरल्यास एक किलो कच्च्या मालापासून 300 प्लेट तयार होतात.
एक किलो थर्माकोलचे साहित्य 200 ते 250 रुपये किलोने मिळते, तर 100 प्लेटचे पाकिट 200 ते 300 रुपये दराने विकले जाते.अशा प्रकारे दिवसाला किमान 1 हजार प्लेट बनवल्या तर महिन्याला 60 ते 80 हजार रुपये मिळतील. त्यातून खर्च वगळून
तुम्हाला तुम्ही महिन्याला 50 हजार रुपये नफा कमवू शकता. माल तयार झाल्यानंतर उरलेला कचराही 50% किमतीत पुनर्वापरासाठी विकला जातो.थर्माकॉल व्यतिरिक्त पेपर कप आणि वाटी बनवण्याचे मशीन 3 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. कॉफी आणि कोल्ड्रिंक्ससाठी बाजारात पेपर कप आणि ग्लास वापरले जातात.
जर तुम्ही रेस्टॉरंट्स किंवा कंपन्यांशी करार करू शकत असाल, तर तुम्ही त्यांच्या लेबलसह वस्तू तयार करून त्यांना पुरवठा करू शकता. अशाप्रकारे, आपण कमाईचा दीर्घकालीन आणि खात्रीचा स्रोत तयार करू शकता.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत या व्यवसायासाठी सरकार 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देते. खादी ग्रामोद्योगमध्ये डिस्पोजेबल केटरिंग उत्पादन बनवण्याचा व्यवसाय देखील सूचीबद्ध झाला आहे. या सर्व योजनांमध्ये व्यवसाय करण्यासाठी, तुम्हाला 90% पर्यंत कर्ज मिळते. खादी, ग्रामोद्योग आणि इतर
अनेक योजनांमध्ये कर्जाच्या रकमेवर देय असलेल्या व्याजावर सबसिडीची तरतूद आहे. या प्रकल्पासाठी 25 टक्क्यांपर्यंत अनुदानही दिले जाते.