माय महाराष्ट्र :राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर विद्यार्थी उद्योजक शेतकरी यांची संस्था असलेल्या कृषि पदवीधर संघटना च्या उद्योगभारती विभागा कडून जे कृषि पर्यटन,अभ्यास दौरे केले जातात त्याचा ब्रॅण्ड म्हणून म्हणजेच व्यापारी चिन्ह म्हणून आता
“महाकृषियात्रा” रजिस्टर ट्रेडमार्क झाला आहे अशी माहिती संस्थेचे महासचिव महेश कडूस पाटील यांनी दिली आहे. महाकृषियात्रा च्या व्यापारी चिन्हात ईस्त्राईल च्या राष्ट्रीय झेंड्यातील चांदणी, डाळींब,द्राक्षे याचे सादरीकरण करण्यात आले आहे.
प्रशिक्षण, पर्यटन, प्रदर्शन व प्रबोधन या चार शब्दांचा या लोगो मधे उल्लेख केला आहे.प्रशिक्षण, पर्यटन, प्रदर्शन, प्रबोधन या चतुःसुत्री वर उद्योगभारती हा विभाग गेले दहा वर्षे काम करीत आहे. आणि “महाकृषियात्रा” यात देखील ही चतुःसुत्री सामावलेली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणे मिळाली पाहिजे, त्यांचे अभ्यास पर्यटन झाले पाहिजे, त्यांना प्रदर्शन मधून प्रत्यक्ष ज्ञान मिळाले पाहिजे आणि शेती क्षेत्रातील खरे खोटे ज्ञान याचे प्रबोधन करणारा ब्रॅण्ड म्हणजे महाकृषियात्रा असणार आहे.
कृषि पदवीधर संघटना ने उद्योगभारती च्या माध्यमातून व्यवसायिक सेवा द्यायला सुरुवात केल्याने पर्यटन क्षेत्रा सारख्या ग्लॅमरस व स्पर्धात्मक क्षेत्रात काम करताना स्वतः चे ब्रॅण्ड नेम आणि ब्रॅण्ड इमेज असणे आवश्यक आहे. महाकृषियात्रा या ब्रॅण्ड च्या नावात सर्व काही आहे.
आता कोरोना नंतर कृषि पर्यटन हळूहळू पुन्हा उभे राहिले आहे. महाकृषियात्रा अंतर्गत सिक्कीम सेंद्रिय शेती कृषि अभ्यास दौरा आता पुढच्या वर्षी जाने – फेब्रुवारी मध्ये असून ईस्त्राईल सह थायलंड कृषि दौरे व दुबई व्यवसायिक प्रदर्शने सुरू होतील.
शेतकऱ्यांच्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही नेहमी ऋणात आहोत, महाकृषियात्रा हे नाव सर्वसामान्य शेतकरी व आमचे ग्राहक लाभार्थी सभासद आपलेसे करतील असे महेश कडूस पाटील यांनी सांगितले आहे.