Thursday, January 20, 2022

नगर ब्रेकींग: विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेस बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेला मागे घेण्यासाठी तरूणाने नोकरदार महिलेला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास भिंगार पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगेश रामचंद्र घायतडक वय 39 रा. माधवबाग, बालाजी कॉलनी, भिंगार असे गुन्हा दाखल झालेल्या

आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी फिर्यादी यांनी घायतडक याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा  दाखल केला आहे. शनिवारी रात्री घायतडक हा त्याच्याकडील दुचाकीवरून बंदुक घेऊन फिर्यादीच्या घरी गेला.

घरासमोर फिर्यादीच्या दिशेने बंदुक धरून, तू माझ्याविरूद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घे, नाही तर तुला व तुझ्या नवर्‍याला सोडणार नाही, असे म्हणत फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी आरोपी घायतडक यास अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करीत आहे

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!