Monday, July 4, 2022

संतापजनक:मोहम्मद शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्काराच्या धमक्या?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनेकदा माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपल्या आसपास घडत असतात. पण काही घटना ऐकून राग अनावर होऊन एक तीव्र सनक डोक्यात जाते. असचं काहीसं घडलं आहे भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत.

यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाने अतिशय खराब कामगिरी केली आहे. त्यात पाकविरुद्ध पराभवानंतर गोलंदाज मोहम्मद शमीवरही चूकीच्या टीका झाल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर त्याच्या समर्थनार्थ उभा राहणाऱ्या विराटच्या बाबतीत

त्याहूनही वाईट घडलं आहे. शमीला समर्थन दिलं म्हणून विराटच्या अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे.अज्ञात माथेफिरुने अशाप्रकारच्या धमक्या दिल्याचं वृत्त समोर येत असून यावर अधिकृत कोणतंच वक्तव्य अजून आलेलं नाही.

पण या सर्वावरुन  नेटीझन्स मात्र कमालीचे संतापले आहेत. सर्वजण ट्विट करत या गोष्टीचा निषेध करत असून आपला राग ट्विटद्वारे व्यक्त करत आहेत. पाकचा माजी कर्णधार इंझमाम उल हकनेही या गोष्टीचा निषेध व्यक्त करत कोणालाही खेळाडूच्या कुटुंबावर कोणतीच प्रतिक्रिया देण्याचा हक्क नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

तर अनेक नेटीझन्सनी संताप व्यक्त केला असून एका महिला पत्रकाराने ही गोष्ट वाचून अगदी उल्टी करावीशी वाटत आहे असं ट्विट केलं आहे.टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव झाला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच

भारताचा पराभव केला होता. ज्यामुळे चाहत्यांचा राग सोशल मीडियाद्वारे खेळाडूंवर  उफाळून आला.  दरम्यान पाकिस्तानच्या हातून झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला टीकांचा धनी व्हावं लागलं होतं. कारण शमीने 3.5 षटकात 43 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 6 चौकार, एक षटकार ठोकला. या खराब कामगिरीनंतर लोकांनी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले आणि त्याच्यावर उलट-सुलट आरोप केले होते. ज्यानंतर सेहवागपासून विराटपर्यंत तसेच अनेक परदेशी क्रिकेटपटूही शमीच्या समर्थनार्थ उभे राहिले होते.

ताज्या बातम्या

देवगड येथील श्री समर्थ सदगुरू श्रीकिसनगिरीबाबांच्या नगर प्रदक्षिणा दिंडीचे पंढरपूरमध्ये उत्स्फूर्त स्वागत

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पंढरपूरमध्ये काढण्यात आलेल्या श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुका पालखी दिंडीचे...

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...
error: Content is protected !!