माय महाराष्ट्र न्यूज:अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीकडून 5 लाख रुपये घेऊन दे, तरच गुन्हा मिटविल नाहीतर तुझी बायको कर्जतला आली तर तमाशात पाठवून नाचायला लावीन असे धमकी देऊन शिविगाळ करून मारहाण करण्यात आली.
तसेच तुला जिवंत सोडणार नाही असे सांगत धमकावल्या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.31 ऑक्टोबर रोजी कुळधरण येथे दहिश्वर उचल्या भोसले (वय 22, रा. टाकळी ता. करमाळा जि सोलापूर, हे त्यांच्या बहीणीकडे असताना
बलात्कार गुन्ह्यातील आरोपीकडून पाच लाख रुपये घेऊन दे तरच गुन्हा मिटविन नाहीतर तुझी बायको कर्जतला आली तर तमाशात पाठवून नाचायला लावीन असे म्हणाला. आरोपी शोभा सत्यवान भोसले व सत्यवान चंद्रकांत काळे शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
धनराज काळे यांनी लोखंडी कुकरी डोक्यात मारून दुखापत केली. तसेच ताकदीर सत्यवान काळे यांनी पाठीत दगड मारला आणि म्हणाला तु जर कर्जतमध्ये दिसला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. घटनास्थळी माळशिकारे यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.