Tuesday, January 18, 2022

राज्यात या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: 2 नोव्हेंबरनंतर चार ते पाच दिवस पावसाळी स्थिती असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दक्षिण आणि पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा पट्टी निर्माण झाला तर 2 ते 10 नोव्हेंबर

दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता कमी आहे. तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पाऊस 6 ते 11 नोव्हेंबरदरम्यान पडले, अशी शक्यता आहे.

तर बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनरपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे दक्षिण भारतात काही ठिकाणी पाऊस सक्रिय असेल मात्र, महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे

दिवाळीच्या दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील किमान तापमान सरासरीप्रमाणे आहे. विदर्भात अमरावती, ब्रह्मपुरी गोंदिया भागात किमान

तापमान सरासरीच्या खाली असल्याने तेथे रात्रीचा गारवा जाणवत आहे.अनेक शेतक-यांची पिकं काढणीची लगबग सरु आहे. अशात पाऊस झाल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना असल्याने थंडीची चाहूल लागण्याची शक्यता आहे.

त्यातच पाऊस झाला तर हवेत अधिक गारवा जाणवणार आहे. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, जळगाव वगळता सर्वत्र किमान तापमान सरासरीच्या जवळ आहे. कोकण विभागात मुंबई परिसरात ते सरासरीपेक्षा 1 अंशांने अधिक आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!